Signup Form

It's quick and easy.

After creating account, Login with User Id (Mobile Number) and Password to complete your Profile.

गाबीत समाजाच्या क्रिकेट टूर्नामेंट २०२२ - २०२३
गाबीत समाजाच्या क्रिकेट टूर्नामेंटचे नियम खालील प्रमाणे असतील:
१. क्रिकेटचे सर्व नियम लागू असतील.
२. सर्व खेळाडूंचे आधार कार्ड, जातीचा दाखला (ओरिजिनल) दाखवून त्या खेळाडूंना टूर्नामेंट खेळण्यासाठीचे ओळख पत्र दिले जाईल.
३. ज्या खेळाडूंचा जातीचा दाखला उपलब्ध नसेल पण तो गाबीत असेल तर त्यांच्या भावाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला असेल तर ही कमिटी त्यांना एक वर्ष खेळू देईल. या एक वर्षांमध्ये त्यांनी जातीचा दाखला तयार करून घ्यावा.
४. टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी संघाने 15 खेळाडूंची नावे टूर्नामेंट सुरु होण्याआधी देणे बंधनकारक आहे. या पंधरा खेळाडूंमधील बारा खेळाडू फायनल पर्यंत खेळतील. जर उरलेले तीन खेळाडू मैदानात उतरले नसतील तर ते दुसऱ्या टीममधून खेळू शकतील. परंतु एकदा हे खेळाडू दुसऱ्या संघातून खेळले तर त्यांना मूळ संघातून खेळता येणार नाही.
५. संघामध्ये १२ खेळाडू कायमस्वरूपी ठेवणे बंधनकारक आहे. जर एखाद्या संघाने ११ खेळाडू त्यांच्या टीम मधून टूर्नामेंटमध्ये खेळवले आणि उर्वरित चार खेळाडू दुसऱ्या संघातून खेळले. अशा परिस्थितीत काही अपरिहार्य कारणामुळे संघातील एखाद्या खेळाडूला मैदानात उतरता आले नाही तर कॅप्टनला उरलेल्या खेळाडूंना घेऊनच खेळावे लागेल. कोणताही बदली खेळाडू घेता येणार नाही.
६. पायचीत ठेवावे की नाही याबद्दलचा सर्व अधिकार टूर्नामेंट आयोजकांकडे राहील.
७. एखाद्या गोलंदाजाच्या शैलीबद्दल जर विरोधी संघाने आक्षेप घेतल्यास त्याबद्दलचा सर्वाधिकार मैदानातील दोन पंच व टूर्नामेंट आयोजकांकडे राहील. संशयास्पद शैली सिद्ध झाल्यास अशा गोलंदाजाला त्या क्षणी पुढील सर्व सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात येईल. सदर खेळाडू याच कारणासाठी पुढील टूर्नामेंटमध्ये दोषी आढळल्यास पूर्ण सीजन भर गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात येईल.
८. सर्व खेळाडूंचे जातीच्या पुराव्याचे पडताळणीचे काम व्हि. आर. सी. सी. आनंदवाडी आयोजित स्पर्धेदिवशी करण्यात येईल.
९.पडताळणी झालेल्या सर्व खेळाडूंना नंतर नोंदणी कार्ड दिले जाईल.