गाबीत समाजाच्या क्रिकेट टूर्नामेंटचे नियम खालील प्रमाणे असतील:
१. गाबीत समाज 🆔🪪 कार्ड नवीन सीझन साठी बंधनकारक असेल, मॅच वेळी 🆔 🪪 कार्ड नसेल तर तो खेळाडू मॅच खेळू नाही शकत.
२. 🆔 🪪 कार्ड हरवल्यास खेळाडूंनी कर्णधार नवीन 🆔🪪 कार्ड साठी कमिटी कडे 🆔 हरवल्याची नोंद करेल, कमिटी नोंद करून ३०० रुपये घेऊन 🆔 कार्ड ची प्रोसेस करेल. आणि 🆔 कार्ड उपलब्ध करून देईल, मॅच च्या दिवशी कोणाची नोंद करून घेतली जाणार नाही.
३. जे खेळाडू प्रथमच गाबीत समाज मध्ये खेळणार आहेत त्यांनी 🆔🪪 कार्ड साठी ची प्रोसेस दिनांक १० डिसेंबर २०२४ पर्यंत करावी, त्या नंतर येणार खेळाडू न या सीझन मधे खेळायला मिळणार नाही.
४. नवीन खेळाडूंनी आपल्या टीम च्याच कर्णधाराकडे 🆔🪪 कार्ड ची फी 150 रुपये जमा करावी , तत्पूर्वी खेळाडूंनी साइट वर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे, ते झाले की कांजूर मध्ये जाऊन ऑफलाईन व्हेरिफिकेशन करून घ्यावे किमान २ कमिटी मेंबर्स ला ओरिजनक डाक्युमेंट दाखवून त्यांची सही घ्यावी ते झाले की कर्णधार कमिटी कडे 150 रुपये जमा करेल आणि त्याचे 🆔🪪 तयार केले जाईल.
५. डायरेक्ट कमिटी कडे न येता आधी कर्णधाराशी संपर्क करावा, (मागच्या वर्षी 🆔🪪 कार्ड खेळाडूंकडे पोहचली नाही परिणामी कमिटीला स्वतःच्या खर्चाने २० 🆔🪪 परत बनवावे लागले) id 🆔🪪 चे संपूर्ण जबाबदारी ही कर्णधाराची असेल.
६. प्रत्येक मॅचला दोन्ही कर्णधारांनी २नही टीम चे 🆔🪪 आहेत की नाही ते क्रॉस ✅ चेक करूनच मॅच स्टार्ट करावी, ३० मीनीट अगोदर जेणेकरून आयोजकांना कोणताही त्रास नको.
७. ज्या खेळाडूंचे 🆔🪪 कार्ड मिळाले आहे परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये एकाच कमिटी मेंबर ची सही आहे त्या खेळांची यादी कमिटी लवकरच जाहीर करेल त्या खेळाडूना परत एकदा डाक्युमेंट दाखवावे लागतील.
८. चालू मॅच मध्ये जे कोण पंच असतील त्यांच्या निर्णयावर कोणीही प्रतिउत्तर देऊ नये दिलेल्या निर्णयाचा आदर करावा, जर कोणत्याही प्रकारचे आक्षेप किंवा प्रतिउत्तर दिल्यास आयोजक त्यावर जे काही पेनल्टी देईल ती त्या संघास मान्य करावी लागेल.
९. मागच्या हंगामात लॉट ऑनलाईन झाले तसे यावर्षी ही होतील, लॉट पडल्यावर कोणत्याही टीम ने टीम कॅन्सल करू नये केल्यास त्या टीमला पूर्ण एंट्री फी द्यावीच लागेल जो कर्णधार टीम देईल त्याची १२ खेळाडूंची टीम ची जबाबदारी राहील.
१०. कर्णधार मीटिंग मध्ये नवीन कमिटी मेंबर्स ची सभासद म्हणून निवड केली जाईल.
११. कर्णधार सोबत उप कर्णधार आणि टीम मधील कोणतेही २ खेळाडू गाबीत समाज मेन ग्रूप मध्ये समावेश करण्यात येतील कर्णधाराने आपले ३/ ४ खेळाडू ग्रूप मध्ये नसतील तर ते समाविष्ट करण्यासाठी ॲडमिनला सांगावे.
१२. गाबीत समाज ग्रुप वर कोणताही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, टाकल्यास ॲडमिन लगेच पोस्ट डिलिट करेल आणि कर्णधाराला ⚠️ वॉर्निंग दिली जाईल.
१३. कोणीही अनावशयक पोस्ट वर चर्चा करू नये आपली सीनिअर मंडळी या ग्रुपला आहेत याचे भान ठेऊन चेष्टा मस्करी करावी.
१४. सध्या ग्रुप मध्ये 🚂 ट्रेन 🎫 तिकीट चे मेसेज येत आहेत कमिटी ची त्याला पूर्ण मान्यता आहे आपल्याच बांधावान ना त्याचा फायदा होईल आणि कोणाचे तिकीट वाया जाणार नाही, पण जे लोक त्या मेसेज ची थट्टा करतात त्यांनी ती थट्टा करू नये.
१५. सध्या सगळेच सामने यू ट्यूब लाइव्ह होत चालले आहेत आयोजक त्यासाठी खूप मेहनत घेतात २/३ महिने सपूर्ण अरेंज करण्यासाठी घालवतात पण जे खेळाडू मॅच खेळत नाही आणि तरी पण घरी बसून पंचांच्या चुकीच्या निर्णयाची व्हिडिओ काढून ग्रुप वर टाकतात आणि शेवटी ग्रूप चे वातावरण खराब करतात ते थांबल पाहिजे, आयोजक मेहनत करतात आणि रात्री ग्रुप वर भांडण असतात जे कोण व्हिडिओ टाकेल यावर आयोजक आणि कमिटी पेनल्टी देईल, कोणाला काही पटलं नसेल तर दत्ता सर आणि विष्णू सर यांच्याकडे तुम्ही पर्सनली कॉल किंवा मेसेज करा ग्रुप चे वातावरण खराब करू नये. विजेत्या आणि उपविजेत्या टीम आणि आयोजकांचे आभार चे मेसेज नक्की करा जेणे करून सध्या कमी होणारे टुर्नामेंट वाढतील तुमच्या ह्याच व्हिडिओ मुळे आज काल गाबीत समाज टुर्नामेंट कमी होत चालले आहेत.
१६. एक गाव एक संघ. नेव्हल डॉकयार्ड संघामध्ये कमिटी ने नवीन बदल केले आहेत. COY ४०+ चेच खेळाडू खेळतील अजून कोणतेही खेळाडू त्या मध्ये खेळणार नाही याची कर्णधाराने नोंद घ्यावी. आणि ४०+ COF ची लिस्ट १० डिसेंबर पर्यंत कमिटी कडे पाठवावी. ज्या खेळाडूंना बॅन केले आहेत त्या खेळाडूना सोडून बाकीच्यांची यादी पाठवावी.
१७. एक गाव एक संघ मध्ये ज्या गावचा संघ पूर्ण होत नाही ज्यांमध्ये खेळाडू कमी पडत आहेत किंवा ज्या गावामध्ये कमी खेळाडू आहेत किंवा १ च खेळाडू आहेत तरी पण त्यांना एक गाव एक टीम मधे खेळायचे आहे अशा खेळाडूंचा विचार कमिटी ने यावर्षी केला आहे. ज्याचे कमी खेळाडू आहेत आणि त्यांना एक गाव एक टीम स्पर्धा खेळायची आहे (जे खेळाडू मुंबई मध्ये कामानिमित्ताने/ कायमस्वरूपी राहणारे खेळाडू) अशा खेळाडूंनी आपली नावे येत्या १० डिसेंबर २०२४ पर्यंत कमिटी कडे द्यावी आणि कर्णधारांनी पण ज्यांच्याकडे कमी खेळाडू आहेत आहेत तरी पण त्यांना टीम टाकायची आहेत त्यांनी पण आपली नावे कमिटी कडे द्यावी. कमिटी कर्णधार मीटिंग मध्ये जे काही २०/२५ खेळाडू असतील त्यांना चिट्टी मार्फत खेळाडू वाटले जातील ज्या टीम ची टीम होत नाही ते कर्णधार चिट्टी मार्फत खेळाडू घेतील आणि ते खेळाडू त्या सीजन साठी त्या टीम चा पार्ट असेल आणि त्या खेळाडू ला त्या टीम मधूनच एक गाव एक टीम मधे खेळण्याची मुभा कमिटी ने दिला आहे जेणेकरून ज्यांची टीम होत नाही त्यांना एक गाव एक टीम मधे खेळायला मिळेल . या पुढे आयकॉन खेळाडू एक गाव एक टीम मधे कमिटी ने काढला आहे याची नोंद आयोजकांनी घ्यावी.
१८. येत्या १५ दिवसात गाबीत समाज कर्णधारांची मीटिंग लावण्यात येईल त्यात सर्व कर्णधांनांनी आपली उपस्थिती दाखवावी एक दिवस वेळात वेळ काढून या मीटिंग ला हजर रहावे, जो कर्णधार जर मीटिंग ला नसेल तर उपकर्णधारांनी मीटिंग ला उपस्थित रहावे तोहि नसेल तर टीम मधील कोणी एकाने मीटिंग अटेंड करावी. कर्णधारांनी ग्रुप वर अगोदरच सांगावे जे कर्णधार गावी असतात त्यांनी बदली खेळाडू पाठवावा, मागच्या वर्षी भरपूर कर्णधार मीटिंग ला उपस्थित नवते आणि नंतर ग्रुप वर चर्चा करत होते यावर्षी वेळ काढून सर्वांनी उपस्थित रहावे.
१९. या सीझन मधे गाबीत समाज प्रीमिअर लीग GSPL चे आयोजन कमिटी तर्फे करण्यात येणार आहे. स्पर्धा लीग पद्धतीने होईल तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
२0. गाबीत समाज ची ओपनिंग टुर्नामेंट हिमालय क्रिकेट संघ मोर्वे यांस कडून दिनांक ११/१२ जानेवारी २०२५मध्ये स्टार्ट होईल.
आपली
गाबीत समाज कमिटी